Tuesday, June 8, 2010
...म्हणजे काय हे कळलं नाही.
यूएन तर्फे दूरध्वनी वरुन निरनिराळ्या देशात एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात फक्त एकच प्रश्न विचारला गेला.
तो प्रश्न असा:
"कृपया उर्वरित जगातील अन्न टंचाई समस्येबाबतच्या उपायांबद्दल तुम्ही आपले प्रामाणिक मत सांगू शकाल काय? "
पण हे सर्वेक्षण अयशस्वी ठरले. त्याची कारणे पुढील प्रमाणे:
१. पूर्व युरोप मधील लोकांना "प्रामाणिक" म्हणजे काय हे कळलं नाही.
२. पश्चिम युरोप मधील लोकांना "टंचाई" म्हणजे काय हे कळलं नाही.
३. आफ्रिकेतील लोकांना "अन्न" म्हणजे काय हे कळलं नाही.
४. चायनीज लोकांना "मत" म्हणजे काय हे कळलं नाही.
५. मध्य पूर्वेतील लोकांना "उपाय" म्हणजे काय हे कळलं नाही.
६. अमेरिकन लोकांना उर्वरित "जग" म्हणजे काय हे कळलं नाही.
७. दक्षिण अमेरिकी लोकांना "कृपया" म्हणजे काय हे कळलं नाही.
८. आणि सर्वात शेवटी इंग्लंड मध्ये हा कॉल मधेच बंद करण्यात आला, कारण कॉल करणार्या दक्षिण भारतीय माणसाचे ईंग्लिश उच्चारच त्यांना समजले नाहीत.
-बोलघेवडा
(एका इंग्लीश विनोदावर आधारित)
Subscribe to:
Posts (Atom)