माझी पुणेरी ऑरकुट प्रोफाइल
About Me:
- ही प्रोफाइल वाचण्या आधी हे नियम वाचा.
- ही जोश्यांची प्रोफाइल नाही. वारंवार चौकश्या करू नयेत. अपमान होईल !
- स्क्रॅपबुक वर विनाकारण स्क्रॅप टाकु नयेत. उत्तरे मिळणार नाहीत.
- स्क्रॅपबुक वर थिललर वा आचरट प्रश्न विचारल्यास तशीच उत्तरे दिली जातील.स्क्रॅपबुक वर जाहिराती अथवा आचरट मजकूर टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
- ह्या प्रोफाइल ला वारंवार भेट देऊ नये. बॅंड विड्थ मर्यादित आहे. आम्ही बॅंड विड्थ चे पैसे भरतो.
- या प्रोफाइल वरचा मजकूर इतरत्र कोपी पेस्ट केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
- प्रोफाइल वरचे फोटो मनोरंजना साठी लावले आहेत. त्याचा खासगी मालमत्ते सारखा वापर करू नये.
- फोटो जास्त वेळ बघू नयेत. फोटोची झीज झाल्यास दंड पडेल.
- ही देशपांड्यांची खासगी जागा आहे. आत पाहण्यासारखे काही नाही.
- अनोळखी व्यक्तिंनी भेट देऊ नये. अपमान झाल्यास आम्ही जबाबदार नाही.
- फिरत्या ओनलाईन विक्रेत्यानि आत येऊ नये. त्यांच्या कंप्यूटर मध्ये व्हायरस गेल्यास आम्ही जबाबदार नाही.
- वाट्टेल तिथे उगाच क्लिक करत बसू नये. काही मोड्तोड झाल्यास खर्च भरून द्यावा लागेल.
- ही कामाची जागा आहे. गप्पा मारायचा आड्डा नाही.
passions:
- पुण्यातल्या प्रत्येक गोष्टी बाबत जाज्वल्य अभिमान बाळ्गणे.
sports:
- पुण्यातल्या रस्त्यां मधून वाहन चालवणे.
- वाहने चालवताना गप्पा मारणे.
- चालत्या बस मधून उतरणे वा चढणे.
- गाडीच्या होर्न चा वाद्या सारखा उपयोग करणे.
activities:
- आपल्या मालकीच्या प्रत्येक वस्तू वर पाट्या लावून दुसरयांना सतत उपदेशाचा डोस पाजणे.
- अड्ड्यावर कोंडाळे जमवून आपल्या जिभेची धार वाढवण्याचा सराव करणे.
- प्रत्येक व्यक्तीचे दर आठवड्याला बारसे करणे. ( दर आठवड्याला नवीन टोपण नाव ठेवणे)
- सिंहगडा वर जाणे. ( फक्त गाडीने!!)
- टोमणे मारणे.
- "आपले ठेवायच झाकून आणि दुसर्याच पाहायाच वाकून" या उक्तिचे कटाक्षाने पालन करणे.
- फोन वर कधीही हेलो चा वापर न करणे.
- दुसर्याच्या पार्ट्याना आधी दिवसभर न जेवता जाणे.
- स्वता: च्या पार्टीला पाकीट अशक्त आहे म्हणून आयत्या वेळी टांग मारणे.
- घरच्या घरी पतंगाचा मांजा बनवणे.
- सायकल वरुन जाताना वृद्ध इसमास "ए बाळ बाजूला हो", अश्या आपल्या वयास न शोभणार्या हाका मारत जाणे.
- सायकल वरुन जाताना केळिवाल्याला केळ्यांचा भाव विचारत जाणे.
- दुपारी एक ते चार दुकान बन्द ठेवणे.
- मिठाईच्या दुकानात देखील "इथे हवा भरून मिळेल का?" अशी निरागस चेहर्याने चौकशी करणे.
- घरात झुरळे मारायची उदबत्ती लावून बाहेर पसार होणे, आणि शेजार्यांची गम्मत बघण्यासाठी संध्याकाळी उशिरा उगवणे.
- वरच्या मजल्यावर ठोका ठोक चालू असल्यास खालून काठीने ठोकून वरच्या मजल्यावरच्या लोकाना इशारा देणे.
- मित्रांमध्ये एकमेकाला वडिलांच्या नावाने संबोधणे.
काही अभिनव पाट्या
- क्रुपया खिडकीतुन पत्र टाकु नयेत. आमटीत पड्तात. चव बिघडते.
- लाकडी जीन्यावर : चढण्यासाठी वापर करावा... वाजवण्यासाठी नव्हे.
- होटेल मधे : कामाशीवाय बसु नये..
- दुपारी १ ते ४ दार वाजवु नये. येथे माणसे रहातात व ती दुपारी झोपतत..
- अपमान कसा होतो ते पहायचे असल्यास वाजवुन पहा....
- कोर्या कागदाची झेरोक्स काधुन मिळेल.
- येथे कचरा टाकू नये साभार परत केला जाईल
सौजन्य: बोलघेवडा