झेन कथा
एका गावात एक पाथरवट ( दगड फोड्या) राहत होता. तो रोज भल्या पहाटे आपला डोंगरावर जाई आणि मोठ्या शिळा फोडून, त्यांचे तुकडे गावातील शिल्पकारांना विकत असे.
एकदा असाच तो शिळा फोडत होता. दुपारची वेळ... वरुन सुर्य आग ओकत होता. दगड फोड्याने थोडी विश्रांती घ्यायचे ठरवले. त्याने वरुन बघितल तर राजाचा एक मोठा अधिकारी रस्त्यावरून पालखितून मोठ्या मजेत चालला होता. आजूबाजूला सेवक वर्ग त्याची सेवा करत होते. त्याला ना उंहाची पर्वा होती ना पाण्याची!
दगड फोड्या स्तिमित झाला. म्हणाला "अहाहा!! काय सुंदर जीवन आहे. काही त्रास नाही, काही कष्ट नाहीत !! हा माझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. मी जर हा अधिकारी असतो तर काय मजा आली असती." काय आश्चर्य!! तो दगड फोड्या पुढच्याक्षणी तो अधिकारी झाला.
आता तो मजेत होता. काही कष्ट नाहीत. फक्त आराम ! काही तास जातात न जातात तोच त्याची पालखि मोडली. तो नाइलाजानेच खाली उतरला आणि पायी चालू लागला. वर सूर्य होताच आग ओकत. याने विचार केला, माझ्यापेक्षा हा सुर्य किती श्रेष्ठ आहे. काही त्रास नाही. काही कष्ट नाहीत. काय आश्चर्य!! तो दगड फोड्या पुढच्याचक्षणी सूर्य बनला.
आता तो खुशीत होता. मस्त आकाशात विहार करायचा. काही कष्ट नाहीत. फक्त आराम ! आता तो लोकाना छळत होता. अशी त्याची मजा चालू असताना त्याला गुदमरल्यासारखा झाल. काही दिसेचना पुढच ! बघतो तर काय ! अचानक एक ढग त्याला आडवा आला होता. काही केल्या तो ढग हटेचना.
त्याने विचार केला हा ढग जर मला अडवू शकतो तर हा माझ्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ दिसतोय. जर मी ढग झालो तर !! तर मग मीच सर्वात श्रेष्ठ होईन. आणि नेहेमीप्रमाणेच, तो ढग बनला. आता त्याने सूर्यालाही नमविल होत. आता तो सर्वाशक्तिमान होता. मजेत आकाशात विहरत होता. सूर्याला झाकोळून टाकत होता.
इतक्यात तो एका दिशेला खेचला जाउ लागला. त्याला तिकडे जायच नव्हत. पण वारा त्याला खेचत होता. त्याने विचार केला हा वारा जर मला ढकलु शकतो तर हा माझ्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ दिसतोय. जर मी वारा झालो तर !! तर मग मीच सर्वात श्रेष्ठ होईन.
आत्ता तो वारा बनला होता. त्याला ना राजाची भीती , ना सूर्याची, ना ढगाची !! तो मुक्ता हस्ते बागडत होता. ढगाना हलवून सूर्याला झाकत होता.
दाणदिशी तो एकठिकाणी येऊन आदळला. समोर बघतो तो काय एक महाकाय पर्वत त्याच्या समोर उभा होता. त्याला हलतही येईना न पुढेही जाता येईना. त्याने विचार केला हा पर्वत जर मला ढकलु शकतो तर हा माझ्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ दिसतोय. जर मी पर्वत झालो तर !! तर मग मीच सर्वात श्रेष्ठ होईन.
आणि तो पर्वत झाला. त्याला ना राजाची भीती , ना सूर्याची, ना ढगाची, ना वार्याची !! तो घट्ट मांडी ठोकून बसला होता. सगळ्यावर हसत होता. स्वतावरच खुश होत होता. तो जगात आता सर्वश्रेष्ठ, सर्व शक्तिमान होता.
त्याने खाली बघितले. त्याच्या पायाखालची जमिनच सरकली...
दुसरा कोणी एक पाथरवट त्याची मांडी फोडत होता...
तात्पर्य: तुम्ही काढाल ते...
मूळ स्त्रोत: अनामिक
- बोलघेवडा
हेच लेखन माझ्या ब्लॉग वर वाचा
अप्रतिम... तात्पर्य: स्वत:वर प्रेम करा....हे जीवन सुंदर आहे.
ReplyDeletehi katha marathi lekhak v.s.khandekar yanchi ahe.
ReplyDeleteमस्त.
ReplyDeleteSun Faced Buddha, Moon faced Buddha