मराठी मध्ये सध्या विडम्बनाला चांगले दिवस आहेत. याच लाटेचा फायदा घेऊन मी हि 'पोळी' गरम तव्यावर भाजून घेतली आहे. या कवितेचे मूळ कवी श्री. संदीप खरे आणि संगीतकार श्री. सलील कुलकर्णी, तमाम मराठी वाचक यांची माफी मागून आणि कै. आचार्य अत्रे यांना स्मरून मी हि माझी "फणसाची फुले" आपल्याला सदर करत आहे. कृपया गोड मानून घ्यावीत.
नसतेस घरी तू तेव्हा...
नसतेस घरी तू तेव्हा, कप फुटका फुटका होतो,
गिळण्याचे होती वांदे, अन खिसा फाटका होतो.
दुध नासून साय विरावी, कल्लोळ तसा ओढवतो,
हा चहा चवहीन होतो, तरी मलाच प्यावा लागतो. || नसतेस घरी तू तेव्हा...
येतात उन्हें दाराशी, पारोसा तरी मी असतो
खिडकीवर टॉवेल ओला, तव गंध हा कुजका येतो. || नसतेस घरी तू तेव्हा...
तू सांग सखे मज काय, मी सांगू या गॅसवाल्या,
ज्योतीची आच हि मंद, अन नसे स्टोव्ह हा घरात. || नसतेस घरी तू तेव्हा...
- बोलघेवडा
No comments:
Post a Comment